Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाची सुरुवात! सुनेत्रा पवारांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा चार्ज; पाहा व्हिडिओ

image

Sunetra Pawar becomes Deputy Chief Minister Maharashtra full story : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील ज्या दालनातून अजित पवार कामकाज पाहत होते, त्याच दालनात सुनेत्रा पवार यांनी आज प्रवेश केला. त्यावेळी त्या आणि मुलगा पार्थ भावूक झाला होता.

आपल्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि नतमस्तक झाल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांचा समावेश होता. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

आज पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत, जिथे त्या आपल्या खात्याचे पहिले निर्णय घेऊ शकतात. आज संध्याकाळी सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना होणार असून, तिथे त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *