Sudhir Tambe : डॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेसची मोठी कारवाई; पक्षातून निलंबन, चौकशीही होणार

Sudhir Tambe Suspension : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन झालेल्या प्रकारबाबत काँग्रेसने आता कठोर भूमिका घेतली आहे.काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे.

सुधीर तांबे यांनी पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतली. याबाबत चौकशी देखील होणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या परवानगीने की कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे अधिकृत उमेदवार होते. पक्षाने त्यांना एबी फॉर्म देखील दिली होता. मात्र शेवटच्या क्षणी तांबे कुटुंबियांना राजकीय खेळी केली. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असताना देखील उमेदवारी दाखल केली नाही.त्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.

सुधीर तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसची मोठी अडचण झाली. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसकडून कोणीही अधिकृत उमेदवार नाही. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. त्यामुळे सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल अशी शक्यता वर्तवली जात होती.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply