Success Story : हेलिकॉप्टर, फायटर जेट बघायचे..., अखेर ते स्वप्न सत्यात उतरलं, NDA च्या परीक्षेत देशात पहिली आलेला ऋतुजा वऱ्हाडेची यशोगाथा


Success Story : लहानपणी हेलिकॉप्टर, फायटर जेट पाहून भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेला मोठं यश मिळाले आहे. ऋतुजाने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरलं आहे. ऋतुजाने एनडीएच्या परीक्षेत देशात पहिला क्रमांक मिळवला आणि पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

एनडीएने ७५ वर्षात पहिल्यांदाच मुलींसाठी सैन्य दलाची दारं खुली केली आणि याच संधीचं सोनं पुण्याच्या ऋतुजाने केलं. यंदा दीड लाख मुलींनी एनडीएची परीक्षा दिली होती यामध्ये पुण्याच्या ऋतुजा वऱ्हाडेने देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. ऋतुजाच्या या मेहनतीचे आणि यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. आपल्या मुलीचं यश पाहून ऋतुजाच्या आई-वडिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आठपदरी होणार; मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात

ऋतुजाना ऑल इंडिया रँक ३ मिळवत नवा इतिहास रचला आहे. ऋतुजा ही मूळची पुण्याची असून शाळेत असल्यापासूनच तिला भारतीय लष्करामध्ये काम करण्याची इच्छा होती. आज तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. ऋतुजाचे वडील संदीप वऱ्हाडे हे वेब डिझाइन प्राध्यापक तर आई जयश्री वऱ्हाडे या गणिताच्या शिक्षिका आहेत. शाळेत असतानाच ऋतुजाचे वडील तिला घेऊन लष्कर दलाच्या विविध कार्यक्रमांना जात होते. आकाशातून उडत असलेले हेलिकॉप्टर आणि फाइटर विमान पाहून ऋतुजाच्या पंखांना आणखी ऊर्जा मिळाली.

ऋतुजाने पुण्यातील यशोतेज अकॅडमीमध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. आता सैन्य दलात भरती होण्यासाठी ती सज्ज झाली आहे. देशात पहिली आल्यानंतर या सगळ्याच श्रेय ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना आणि अकॅडमीला दिले आहे. ऋतुजाने याआधी विज्ञान ऑलिम्पियाड आणि राज्यस्तरीय गणित स्पर्धांमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऋतुजा एक प्रशिक्षित हार्मोनियमवादक आणि गायिका देखील आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply