Success Story : पोरानं बापाचे नाव मोठं केलं,फक्त २० व्या वर्षी पायलट झाला, अंबरनाथच्या लेकाची ठाण्यात चर्चा


Success Story : प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. मोठं होऊन प्रत्येकालाच काही न काही व्हायचे असतं. असंच स्वप्न अंबरनाथच्या जतीन उमेश पाटीलचं होतं. त्याला लहानपणापासूनच पायलट व्हायचे होते. त्याने त्याचे स्वप्न पूर्ण केलंय. तो अवघ्या २०व्या वर्षी पायलट झालाय.तो ठाण्यातील सर्वात लहान पायलट झालाय.

अंबरनाथच्या कोहोजगावातील जतीन उमेश पाटील यानं ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मान पटकावलाय. जतीनने वयाच्या २० व्या वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

जतीन हा अंबरनाथच्या कोहोजगावातील रहिवासी आणि माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच त्यानं पायलट होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. कुटुंबीयांनी दिलेली भक्कम साथ आणि जिद्दीच्या जोरावर जतीनने वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

KDMC Commissioner : कल्याण डोंबिवली महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून IAS अभिनव गोयल यांची नियुक्ती

विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट होण्याचा मानही त्याने पटकावला. जतीनच्या यशामुळे त्याचे कुटुंबीय भारावून गेले आहेत. इतक्या लहान वयात त्याने घेतलेली गरुड झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. सोशल मीडियातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

अंबरनाथच्या जतीन यांचे पायलट होण्याचेच स्वप्न होतं. जतीनने खूप लहानपणापासूनच मेहनत घेतली. अभ्यास केला आणि स्वतः ला पायलट होण्यासाठी तयार केले. तो अवघ्या २०व्या वर्षीच पायलट झाला आहे. त्याचे हे यश खूप जास्त कौतुकास्पद आहे. त्याच्या या यशाचे सर्वांनाच कौतुक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply