ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; रखडलेला पगार आजच होणार; सरकारकडून ३०० कोटी वितरीत

जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार (MSRTC salary) झालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले. दरम्यान, सरकारकडून कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून ३०० कोटी वितरीत करण्यात आले आहेत.

महाआघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. राज्यात सत्तारानंतरही काहीही बदल झालेला नाही. पगार वाढ सोडा वेळेवर पगार होत नसल्याने एसटी कर्मचारी नाराज आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांन्या 12 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नाही. तसा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला आहे. राज्य सरकारकडून न्यायालयात 7 तारखेदरम्यान पगार होईल, असे सांगण्यात आले होते.

मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरु असून शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply