
Nagpur : राज्यभरातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेबरोबर वाढीव वेतनाचा फरक देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, संबंधित रक्कम न दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.येत्या १० तारखेपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास रितसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी साधारण ४७५ कोटी रुपये खर्च येतो. त्यासोबतच वाढीव वेतनवाढीचा फरक देण्यासाठी दरमहा सुमारे ५८ कोटी ३० लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद आवश्यक आहे. सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीच्या फरकासाठी राज्य सरकार दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये देईल, अशी घोषणा १३ ऑक्टोबर २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व श्रमिक संघटनांच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला मिळालेली नाही.
|
|
त्यामुळे राज्य सरकारची अब्रू वाचवण्यासाठी महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून दोन महिन्यांचा वाढीव वेतनफरक कर्मचाऱ्यांना अदा केला. या महिन्यात तीन महिन्यांची एकत्रित ११६.६९ कोटी रुपयांची रक्कम देण्यात यावी, असे पत्र महामंडळाने २० जानेवारी २०२६ रोजी राज्य सरकारकडे पाठवले होते. तरीही ही रक्कम न आल्याने व्यवस्थापनाने वाढीव वेतनाचा फरक कर्मचाऱ्यांना देऊ नये, असा निर्णय घेतला असून आज कर्मचाऱ्यांना फरकाविना वेतन देण्यात आले.
एकीकडे महामंडळावर सुमारे ४२०० कोटी रुपयांची वैधानिक देणी थकीत असताना, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही सरळ अवहेलना असल्याचे बरगे यांनी स्पष्ट केले. येत्या तीन दिवसांत वाढीव वेतनफरकाची रक्कम न मिळाल्यास रीतसर नोटीस देऊन एसटी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “ST Bus Update : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! सेवा विस्कळीत होण्याची शक्यता; कर्मचाऱ्यांचा सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम”