SSC Result 2024 : शंभर नंबरी सोनं! पुण्याची पोरं हूशार, दहावीच्या परीक्षेत मिळवले १०० टक्के

SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांची आज निकालाची प्रतीक्षा संपली. अनेक विद्यार्थ्यांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष होतं. त्यानंतर आज सोमवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागलाय. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेत पुण्यातील तिघांनी १०० टक्के गुण मिळवण्याचा पराक्रम केला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

१०० टक्के गुण मिळवणारी श्रृजा घाणेकर म्हणाली, 'मला खूप मस्त वाटत आहे. मी मोठ्या कष्टाने अभ्यास केला. त्याचं फळ मला मिळालं आहे. माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे. तिलाही १०० टक्के मिळाले आहेत'. प्राजक्ता नाईक म्हणाली की, 'मला १०० टक्के मिळाले आहेत. मला खूप छान वाटतंय. मी केलेल्या अभ्यासाचं सार्थक झाल्याचं वाटतंय'.

Pune Porsche Car Accident : मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही; दमानियांच्या आरोपांवर अजित पवारांचं रोखठोक उत्तर

पुण्यातील श्रृजा घाणेकर, प्राजक्ता नाईक आणि कैवल्य देशपांडे या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवल्यानंतर या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

१०० टक्के गुण मिळवणारी श्रृजा घाणेकर म्हणाली, 'मला खूप मस्त वाटत आहे. मी मोठ्या कष्टाने अभ्यास केला. त्याचं फळ मला मिळालं आहे. माझ्याबरोबर माझी मैत्रीण आहे. तिलाही १०० टक्के मिळाले आहेत'. प्राजक्ता नाईक म्हणाली की, 'मला १०० टक्के मिळाले आहेत. मला खूप छान वाटतंय. मी केलेल्या अभ्यासाचं सार्थक झाल्याचं वाटतंय'.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply