Kashmir Valley Cold Wave : काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट तीव्र, श्रीनगरमध्ये नीचांकी तापमान; उमर अब्दुलांकडून सर्व कार्यक्रम रद्द

Srinagar : काश्मीर खोऱ्यायात सर्वाधिक थंडीचा काळ सुरू झाल्यानंतर थंडीच्या लाटेची तीव्रताही वाढली आहे. त्यामुळे, खोयात ऊर्जा विभागासह इतर आवश्यक सेवांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी जम्मूतील सर्व कार्यक्रम रद्द करून श्रीनगरमध्येच थांबण्याचा निर्णय जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी घेतला,

श्रीनगरमध्ये शनिवारी उणे ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. ते गेल्या तीन दशकांतील रात्रीचे नीचांकी तापमान ठरले. काश्मीर खोऱ्यात इतरत्रही किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. तापमान गोठणबिंदूखाली असल्याने पाणीपुरवठ्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे.

थंडीची तीव्र लाट व त्यामुळे उ‌द्भवलेल्या या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उमर अब्दुल्ला यांनी जम्मूतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून श्रीनगरमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली.

Pune Dumper Accident Update : फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडण्याऱ्या डंपर चालकाला अटक, पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

त्यात त्यांनी म्हटले आहे, की काश्मीर खोऱ्यातील थंडीची तीव्र लाट व पाणीपुरवठा व वीजपुरवठ्यातील अडथळे लक्षात घेत मी जम्मूतील सर्व कार्यक्रम रद्द करून पुढील आठवडाभर श्रीनगरमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात विद्युत विभागासह इतर महत्त्वाच्या खात्यांवर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवणार आहे. सध्या मी राजस्थानातील जैसलमेरला जीएसटी परिषदेसाठी जात असून उद्या सकाळी परतणार आहे.
राजस्थानातही लाट कायम

राजस्थानातही थंडीची लाट कायम असून रविवारी करौलीत नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सानगारियात ५.३, फतेहपूरमध्ये ५.४ तर चुरू व अल्वरमध्ये ६.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. राज्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा व काही ठिकाणी धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

बारामुल्ला : नियंत्रण रेषेवर रविवारी तैनात असलेला सीमा सुरक्षा दलाचा जवान. काश्मीरमध्ये थंडीची लाट पसरली असून शिखरे हिमाच्छादित झाली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply