राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या

 

Srikanth Box Office Collection Day 1 : बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला बायोपिक ‘श्रीकांत’ हा चित्रपट शुक्रवारी (१० मे रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच चाहते ‘श्रीकांत’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला आणि ‘श्रीकांत’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.‘श्रीकांत’ हा नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक ३२ वर्षीय श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि राजकुमारच्या दमदार अभिनयाचं समीक्षक आणि प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. पण हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. ‘श्रीकांत’च्या कमाईची सुरुवातीची आकडेवारी समोर आली आहे.

Ajit Pawar : आम्ही शेतकऱ्यांची पोर, आम्हाला पावसाची सवय; पुण्यात भर पावसात अजित पवारांचा रोड शो, नागरिकांची तुफान गर्दी

 

‘श्रीकांत’ पहिल्या दिवसाची कमाई

सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘श्रीकांत’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटी रुपये कमावले आहेत. हे प्राथमिक आकडे आहेत, अधिकृत डेटा आल्यानंतर या आकडेवारीत थोडे बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘श्रीकांत’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जवळपास ४० कोटी रुपये खर्च केले आहेत. राजकुमार राव  व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली नसली तरी वीकेंडला या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

 



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply