SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत

SRH vs RR,Qualifier 2: कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

राजस्थान रॉयल्सची मजबूत गोलंदाजीगोलंदाजी हा राजस्थान रॉयल्सचा मुख्य पक्ष आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. त्यामुळे आर अश्विन या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्याला या खेळपट्टीवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच युजवेंद्र चहलही त्याला चांगली साथ देतोय. दोघेही मधल्या षटकांमध्ये धावांची गती राखून ठेवतात. त्यामुळे विरोधी संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतो. यांना जोड म्हणून टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारही चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थानचे गोलंदाज असा सामना पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही.

फलंदाजी क्रम मजबूत असल्याचं दिसून आलं आहे. हेड आणि अभिषेकच्या जोडीनंतर क्लासेनही गोलंदाजांवर तुटून पडतोय. त्याने १८० च्या स्ट्राइक रेटने ४१३ धावा केल्या आहेत. त्यामुळे सलामी जोडी बाद केली म्हणजे काम संपलं असं समजून चालणार नाही. कारण क्लासेनही मोठे फटके खेळून संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो.

राजस्थान रॉयल्सची मजबूत गोलंदाजी

गोलंदाजी हा राजस्थान रॉयल्सचा मुख्य पक्ष आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. त्यामुळे आर अश्विन या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्याला या खेळपट्टीवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच युजवेंद्र चहलही त्याला चांगली साथ देतोय. दोघेही मधल्या षटकांमध्ये धावांची गती राखून ठेवतात. त्यामुळे विरोधी संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतो. यांना जोड म्हणून टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारही चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थानचे गोलंदाज असा सामना पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply