Who is Ranveer Allahbadia : मोदींनी पाठ थोपाटलेला 'रणवीर अलाहबादिया' आहे तरी कोण?

 

Who is Ranveer Allahbadia: सोशल मीडियावर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील सादरीकरणानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. या सगळ्या इन्फ्ल्युअर्सचा आता गौरव करण्यात आला आहे. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातील सर्वाधिक प्रभावी सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तिमत्वांचा समावेश करण्यात आला आहे.त्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे ती रणवीर अलाहबादियाची. त्यानं त्याच्या पॉडकास्टनं वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले आहे. राजकारण,  समाजकारण, अर्थकारण या सारख्या वेगवेगळ्या विषयांवर त्यानं नेटकऱ्यांचे मनोरंजनाबरोबरच त्यांना सजग करण्याचे काम केले असल्याचे बोलले जाते. त्याच्यासह देशातील अनेक सोशल मीडिया सेलिब्रेटींना यावेळी सन्मानित करण्यात आले.

रणबीरच्या बाबत बोलायचे झाल्यास तो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्युंसर असल्याचे बोलले जाते. युवा वर्गात त्याची क्रेझ मोठी आहे. तो एक कंटेट क्रिएटर आणि युट्युबर आहे. त्याचा पॉडकास्ट शो हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याचे नाव बियरबायसेप्स अले आहे. तो पॉडकास्ट हा सर्वाधिक पाहिला जाणारा पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्यानं आजवर अनेक सेलिब्रेटींच्या मुलाखती घेऊन त्यांना बोलते केले आहे.

Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी बीडमध्ये भाजप नेत्याचा कार्यक्रम बंद पाडला, जोरदार घोषणाबाजी

रणवीरला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या ही ३ मिलियन पेक्षा जास्त आहे. तर युट्युबर फॉलो करणाऱ्यांची संख्या ७ मिलियन एवढी आहे. त्यानं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, विदेश मंत्री एस जयशंकर, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पॉडकास्ट केला आहे. याशिवाय करिना कपूर, यामी गौतम, मृणाल ठाकूर, विकी कौशल यांच्याशी संवाद चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानं त्याच्या बियर बायसेप्स आणि द रणवीर शो च्या माध्यमातून चाहत्यांची लोकप्रियता मिळवली आहे.रणवीर हा अलाहबादियामधील एक उद्योगपती देखील आहे. तो मुंबईचा असून त्याचा जन्म २ जून १९९३ मध्ये झाला. त्यानं मुंबईतील धीरुबाई अंबानी शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यानं पदवीधर शिक्षण मुंबईतील द्वारकादास सांधवी कॉलेज ऑफ इंजिनिरिंगमधून घेतले आहे. रणवीर बियरबायसेप्स माँक एंटरटेनमेंट चा को फाउंडर देखील आहे. २०२२ फोर्ब्सच्या २० आशियाच्या लिस्टमध्ये देखील त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply