Virat Kohli: 'आम्ही भारतात नव्हतो, तर...', दोन महिन्यांची विश्रांती अन् मुलाचा जन्म, अखेर विराट झाला व्यक्त

Virat Kohli News: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सोमवारी (25 मार्च) इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातील  पहिल्या विजयाची नोंद केली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बेंगळुरूने सोमवारी पंजाब किंग्स संघाचा पराभव केला.

बेंगळुरूच्या या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीने मोलाचा वाटा उचलला. पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून विराट कोहलीने 49 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावांची खेळी केली.

दरम्यान, विराटने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर या आयपीएल हंगातमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने त्याच्या मुलाच्या जन्मासाठी दोन महिने विश्रांती घेतली होती. त्यामुळे तो जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतीही खेळला नव्हता.

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्याचे नाव त्यांनी अकाय असे ठेवले आहे. विराट आणि अनुष्का यांचे हे दुसरे अपत्य आहे. त्यांना वामिका नावाची 3 वर्षांची मुलगीही आहे.

Nashik Politics : छगन भुजबळांना नाशिकमधून लोकसभा उमेदवारी जवळपास निश्चित; पुढील ४८ तासात निर्णय होणार March

दरम्यान, विराटने सोमवारी पंजाब किंग्सविरुद्ध सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याच्या मुलाच्या जन्माबद्दल आणि त्यासाठी त्याने घेतलेल्या 2 महिन्यांच्या विश्रांतीबद्दल खुलेपणाने भाष्य केले आहे.

तो म्हणाला, 'आम्ही भारतात नव्हतो. आम्ही अशा ठिकाणी होतो, जिथे लोक आम्हाला ओळखत नाहीत. सर्वसामन्यपणे एक कुटुंब म्हणून जगण्यासाठी हा वेळ आम्हाला एकत्र घालवायचा होता. आमच्यासाठी हा एक अप्रतिम अनुभव होता.'

याशिवाय हर्षा भोगले यांच्याबरोबरच्या मुलाखतीत विराट याबद्दल म्हणाला, 'नक्कीच दोन मुलं झाल्यानंतर कुटुंब म्हणून अनेक गोष्टी बदलतात. एकत्र असताना तुमच्या मोठ्या अपत्याबरोबर तुमचे जे नाते तयार होते, ते खूप अविश्वसनीय असते. मला असं म्हणायचंय की मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे.'

त्याचबरोबर विराटने असेही सांगितले की दोन महिने लोकांमध्ये अनोळखी म्हणून राहिल्यानंतर पुन्हा ओळखीच्या ठिकाणी येणे आणि तुमच्या नावाच्या घोषणा ऐकणे, हा एक वेगळा अनुभव होता.

दरम्यान, विराटव्यतिरिक्त सोमवारी बेंगळुरूकडून दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमरोर यांनी नाबाद 48 धावांची भागीदारी केली आणि अखेरच्या षटकात बेंगळुरूचा विजय निश्चित केला. बेंगळुरुने 19.2 षटकात 6 बाद 178 धावा केल्या.

या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या होत्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply