Matheesha Pathirana CSK : सामन्याच्या काही तास आधी चेन्नईसाठी मोठी बातमी! दिग्गज गोलंदाज लवकरच करणार ताफ्यात एन्ट्री

Matheesha Pathirana CSK : आयपीएल 2024 च्या हंगामाची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यातील सामन्याने होत आहे. सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्जला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना फिट घोषित करण्यात आला आहे. तो लवकरच संघासोबत जोडला जाणार आहे.

पथिरानाचा मॅनेजर अमिला कालुगलागेने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पथिरानासोबत फोटो शेअर केला आहे. त्याने सांगितले की पथिराना हा फिट असून मैदानावर परतण्यासाठी तयार आहे. अमिला लिहितो की, 'पथिराना कुठं आहे यांच उत्तर मिळालं आहे. तो फिट आहे आणि पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच दिग्गज खेळाडूंसोबत दिसेल.'

हॅमस्ट्रिंग दुखापतीने होता त्रस्त

पथिराना हा बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. पथिरानाच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे त्याला बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळता आला नव्हता. आता श्रीलंका क्रिकेटकडून परवानगी मिळाल्यावर पथिराना हा सीएसकेच्या संघासोबत जोडला जाईल. आधी आलेल्या बातमीनुसार पथिराना हा दुखापतीमुळे पहिले काही सामने मुकणार आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर! १६ नावांची केली घोषणा; येथे पाहा यादी

सीएसकेसाठी पथिराना महत्वाचा

पथिरानाने आपल्या गोलंदाजीने गेल्या हंगामात सर्वांना प्रभावित केलं होतं. त्याने 12 सामन्यात 8 च्या इकॉनॉमीने 19 विकेट्स घेतल्या होत्या. पथिराना हा गेल्या हंगामात तुषार देशपांडे (21) आणि रविंद्र जडेजानंतर (20) यानंतर सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा फलंदाज आहे. त्याने संघाला आयपीएलचे टायटल मिळवून देण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली होती. धोनीचा तो विश्वासू गोलंदाज आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply