'....म्हणून धोनी क्रिकेटपासून दूर जात गेला', IPL आधी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य

Zaheer Khan on MS Dhoni : क्रिकेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे; परंतु ते सर्वस्व नाही, हे महेंद्रसिंह धोनीने कधीच जाणले होते, म्हणून तो क्रिकेटपासून दूर जात आपल्या कुटुंबाला वेळ देत असतो, असे धोनीचा माजी साथीदार आणि वेगवान गोलंदाज झहीर खानचे म्हणणे आहे.

वयाच्या ४२ व्या वर्षी महेंद्रसिंह धोनी आणखी एका आयपीएलची तयारी करत आहे. आयपीएलच्या प्रारंभापासून चेन्नई संघाचे नेतृत्व करणारा धोनी यंदा विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. शुक्रवारी त्याच्या चेन्नई संघाचा सामना बंगळूर संघासोबत होणार आहे.

क्रिकेट आणि खासगी आयुष्य यातील फरक धोनीने कधीच जाणला होता. क्रिकेटवरचे त्याचे प्रेम किती आहे हे आपण सर्वच जाणतो; पण हेच क्रिकेट सर्वस्व नाही, हा फरकही त्याने जाणलेले आहे, असे झहीरने सांगितले.

Earthquake News : अरुणाचल प्रदेश भल्या पहाटे हादरला, पश्चिम कामेंग परिसरात 3.7 रिश्टर स्केलचे धक्के

देशाला दोन विश्वकरंडक जिंकून देणाऱ्या धोनीने चेन्नई संघाला आयपीएलची पाच विजेतेपद मिळवून दिली आहेत. जेव्हा तुम्ही खेळत असता आणि त्यानंतर ‘स्विच ऑफ’ होणे हे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक खेळाडूला हा बदल करावा लागतो. निवृत्तीनंतर तुमच्याकडे अधिक पर्याय नसतात काही खेळाडू निवृत्तीनंतर अस्वस्थ होतात, कारण खेळण्याच्या वयात त्यांना खेळ एके खेळ हाच विचार केलेला असतो. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर पुढे काय करायचे, हा विचार त्यांनी केलेला नसतो, असे झहीरने म्हटले आहे.

धोनी सर्वच बाबतीत हुशार आणि विचारी आहे. क्रिकेटपासून पूर्ण निवृत्त झाल्यानंतर पुढे काय करायचे, याचाही विचार त्याने केलेला असेल. क्रिकेट वगळता इतर गोष्टीत तो रमलेला असतो, बाईक  याचे तर त्याला वेड आहे. तो या क्षेत्रात सातत्याने संशोधनही करत असतो, असे झहीरने सांगितले.

चेन्नई संघातील धोनीसह आणखी एक महत्त्वाचा माजी खेळाडू सुरेश रैनाबाबत विचारले असता झहीर म्हणतो, रैनाने आणखी पाच वर्षे आयपीएल खेळायला हवी होती. धोनीनंतर चेन्नई संघासाठी पुढचा कर्णधार कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर धोनी इतर जबाबदारी सांभाळत संघासोबत असेल; पण मैदानावर त्यांना चांगल्या कर्णधाराची गरज लागणार आहे. माझ्या मते ऋतुराज गायकवाड हा सध्या तरी चांगला पर्याय आहे, असे झहीरने सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply