Special Report : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं तळघर, तळघरात प्राचीन मूर्ती, जुनी नाणी, आणखी काय दडलंय?

Special Report :  महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत तळघर आढळून आलंय. मंदिराचं प्राचीन पद्धतीनं संवर्धन करण्यात येत होतं. हे काम पूर्णत्वास जातानाचं कर्मचाऱ्यांना तळघराचा शोध लागलायं. मात्र या तळघरात नेमकं काय दडलंय पाहूयात.
 
विठ्ठल मंदिरात आढळून आलेल्या तळघरात 1 विष्णूरुपी मुर्ती, 1 व्यंकटेश मुर्ती, 1 तुळजा भवानी मुर्ती, इतर 3 दगडी मूर्ती, बांगड्यांचे तुकडे, पादुका आणि जुनी नाणी आढळून आलेत.

नऊशे वर्षापुर्वीच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्चपासून सुरू होतं. 2 जूनपासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुलं करण्यात येणारय. मात्र त्यापुर्वीच विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय. यासंदर्भात मंदिर समितीचे मुख्य़ाधिकारी राजेंद्र शेळकेंनी माहिती दिलीय.

भेटी लागे जीवा, लागलीसे आस म्हणत लाखो वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात.मात्र आषाढी वारीच्या पुर्वीच पंढरपूरच्या मंदिरात तळघर आढळून आलंय. तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मंदिरातील तळघराची पाहणी केलीय. यात मुर्ती, पादुका, बांगड्यांचे तुकडे आणि जुनी नाणी आढळून आलेत. त्यामुळे या तळघराविषयीतील मुर्ती कधीच्या आहेत? याचं गूढ पुरातत्व विभागाच्या अभ्यासातून उलगडणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply