Solapur News : बार्शीत कुंटणखान्यावर छापा; दोन मुलींची सुटका, महिलेस अटक

Solapur News :  बार्शी शहरात कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती पुणे येथील सामाजिक संस्थेला मिळाली. यावरून पोलिसांच्या पथकाने येथे छापा टाकून कुंटणखान्यातील दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली.  तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

पुण्याच्या सामाजिक संस्थेला  सोलापूर जिल्ह्यातील  बार्शी शहरातील तेलगिरणी चौकात कुंटणखाना चालवत येथे दोन परराज्यातील मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय केला जात आहे; अशी माहिती मिळाली होती. यानंतर संस्थेने पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधला होता. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमवेत कुंटणखान्यावर छापा टाकला. येथे बनावट ग्राहक तयार करून कुंटणखान्यामध्ये पाठवण्यात आले. यानंतर खात्री पटताच पोलिसांनी धाड टाकली.  

Pune News : पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; नारायणगावातून १० बांग्लादेशी घुसखोरांना पकडलं

सहा महिलांनाही घेतले ताब्यात 

बनावट ग्राहक पाठवून त्याच्याजवळ देण्यात आलेली रक्कम तसेच रोख १७ हजार २०० रुपये रक्कम, दोन मोबाईल, इतर साहित्य असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली असून तेथील आवारात मिळालेल्या सहा इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply