Solapur News : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाज आक्रमक! विखे पाटलांच्या अंगावर उधळला भंडारा; नेमकं काय घडलं?

Solapur News : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून राज्यभरात आंदोलने, आणि उपोषणे होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असतानाच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा जोरदार विरोध आहे. याच मागणीवरुन धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना धनगर समाजही आक्रमक झाला आहे. सोलापूरमधील (Solapur) शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Mumbai Rain News: मुंबईला धुवाधार पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात, वाहतूक विस्कळीत

पालकमंत्री विखे पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान धनगर समाजातील आंदोलकांनी त्यांची घेतली. या भेटीवेळीच शेखर बंगाळे या आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकला. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा अद्याप मिटलेला नसून लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply