सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या Kk एक्स्प्रेसच्या इंजिनाला आग; 2 तासानंतर आग विझवून नवीन इंजिनसह रेल्वे पुढे रवाना

सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या केके रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनला आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. चालकाला मागून येणारा धूर दिसू लागला. त्याने प्रसंगावधान साधून गाडी जागेवर थांबवली. त्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हाताला व अंगाला भाजले आहे. गावकरी त्या ठिकाणी धावले, त्यांनी देखील मदत केली. अग्नीशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले. सर्व प्रवाशांच्या चेहर्‍यावर चिंता आणि भीती होती.सोलापूर : मोहोळ- कूर्डूवाडी रेल्वे रूळावरील घाटणे परिसरात रेल्वे इंजिनने पेट घेतला. यात कोणताही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहीती आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

National Highway : गुजरातसह 'चार' राज्यांना जोडणार बुलढाणा महामार्ग, गडकरींनी केलं 816 कोटींच्या रस्त्याचं उद्घाटन

(गाडी पुढील प्रवासासाठी रवाना) आग विझवून झाल्यावर दुसरे इंजिन बोलावून घेतले. आता 2 तासानंतर गाडी नवीन इंजिनसह दिल्लीकडे मार्गस्थ झाली आहे. चालक देखील बदलण्यात आला आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply