Solapur News : चालक दारूच्या नशेत, एसटी बसचा भीषण अपघात, ७-८ जणांची प्रकृती गंभीर

Solapur News : सोलापूर - अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ एसटी चालकाच्या बेशिस्तपणामुळे एक भीषण अपघात घडला आहे. एका एसटीने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना पाठीमागून धडक दिली आहे. पाठीमागून एसटीनं धडक दिल्यामुळे ७- ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

एसटी चालक त्यादरम्यान मद्यधुंद अवस्थेत होता. अशी माहिती प्रवांशाकडून देण्यात आली आहे. सुदैवाने यात जिवितहानी झालेली नाही. मात्र, काही प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

अक्कलकोट महामार्गावर कुंभारीजवळ एक भीषण अपघात घडला आहे. एका एसटीने पाठीमागून काही वाहनांना जबर धडक दिली आहे. एसटीने टोल नाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना जोरात धडक दिल्यामुळे समोरचे तीन ते चार वाहनं एकमेकांवर आदळली आहेत.

या अपघातात ७ ते ८ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर तातडीने जखमींना सोलापूर शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

एसटी चालक एसटी चालवताना मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती काही प्रवाशांनी दिली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे हा अपघात घडल्याचं बोललं जात आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झालेली नाही.

ट्रकचा भीषण अपघात, ५-६ वाहनं एकमेकांवर आदळली

सोलापूरहून बीडच्या दिशाने जाणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ट्रकमधील हरभऱ्याची पोते रस्त्यावर पडले आहेत. अचानक समोरील वाहनाने ब्रेक दाबल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, पाच जण जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर जवळपास पाच ते सहा वाहने एकमेकांवर धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply