Solapur : सोलापूर- पुणे महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Solapur : सोलापूरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघात एक जण जखमी झाला आहेत. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामुळे तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर वडवळ गावाजवळ सकाळी भीषण अपघात झाला. या विचित्र अपघातामध्ये महामार्गाचा एक कर्मचारी गंभीर जखमी झाल असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. अपघातामुळे सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत. एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून राहिल्यामुळे आणि उकाड्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Follow us -

Pune : हडपसरमध्ये कोयता गँगची दहशत, दुकानं-वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक

अपघाताची माहिती मिळताच, सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून हटवण्याचे काम सुरू आहे. त्याचसोबत पोलिसांकडून देखील वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या अपघातामुळे घटनास्थळावर पाहणाऱ्यांची देखील गर्दी झाली आहे.

दरम्यान, नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी पहाटेपासून या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर ही वाहतूक कोंडी पोलिसांकडून सोडवण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply