Solapur Accident News : कार- बस अपघातात साेलापूर पाेलीस दलातील अधिकाऱ्यासह सहा जखमी

Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास कार आणि बस मध्ये झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती समाेर आली आहे. हा अपघात बार्शी-सोलापूर रस्त्यावरील सौंदरे गावाजवळ झाल्याची माहिती पाेलीसांकडून मिळाली. 

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : सोलापूरहून बार्शीच्या दिशेने कार निघाली हाेती. बार्शीकडून सोलापूरच्या दिशेने बस चालली हाेती. सौंदरे गावाजवळ या दाेन वाहनांत अपघात झाला.

Ajit Pawar : राज्यात अवकाळी पावसाचा फटका; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक

या अपघातामध्ये कारमधील साेलापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकाऱ्यासह चौघे तर बसमधील महिला वाहक आणि एक प्रवासी असे सहाजण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे.

बसच्या समोरच्या भागातील काचा फुटल्या आहेत. दरम्यान जखमींना बार्शीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलीसांनी दिली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *