Solapur : 'मीच गळा दाबून तिला पुरलं'; पोटच्या लेकीला वडिलांनी संपवलं, रात्री मायेनं जवळ गेली अन् नराधमाने..

Solapur : बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापुरातून समोर येत आहे. बापाने आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. नराधम बापाने आधी चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली नंतर तिचं प्रेत पुरलं. मात्र, पोलिसांच्या तपासात आरोपी बापानेच मुलीची हत्या केली असल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे असे आरोपी बापाचे नाव आहे. तर, मयत श्रावणी आपल्या वडिलांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात राहत होती. आरोपी ओगसिद्धला तीन मुली आणि एक मुलगा आहे. पत्नी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, तर दोन मुली आणि मुलगा गावातील आजोळी गेले होते.

घटनेच्या दिवशी मयत श्रावणी वडिलांजवळ झोपण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री आरोपीने तिचा गळा दाबून हत्या केली. नंतर घराशेजारी खड्डा खोदून तिचं प्रेत पुरण्यात आलं. शुक्रवारी सकाळी आजोबा रेवणसिद्ध कोठे यांनी नात श्रावणीची चौकशी केली. गावात आणि आजोळी शोध घेतला पण काही माहिती मिळाली नाही. दरम्यान वस्तीवर जमलेल्या नातलगांच्या लक्षात आलं की घराशेजारील खड्ड्यात नव्याने माती टाकलेली आहे आणि चिखलात पावलांचे ठसे आढळले.

Vaishnavi Hagavane : वैष्णवी प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, निलेश चव्हाण आत्मसमर्पण करणार

संशय वाढल्याने नातलगांनी ओगसिद्ध याच्यावर दबाव टाकला. त्यावेळी त्याने “मीच गळा दाबून खून केला आणि तिला पुरलं” अशी थेट कबुली दिली. यानंतर मंद्रूप पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या अमानुष हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी प्रेत ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply