Sugar Factory : सोलापूर विभागात १६ साखर कारखाने पडले बंद; जानेवारीतच जाणवतोय उसाचा अभाव

Solapur : यंदा जानेवारी महिन्यापासून साखर कारखान्यांचे पट्टे पडू लागले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांत साखर कारखाने सुरू असले, तरी सोलापूर विभागातील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील १६ साखर कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कारखाने ऊसाअभावी बंद झाले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप साखर आयुक्त कार्यालयाला कळविले नसल्याचे सामोर आले आहे.

मागील वर्षी पाऊस कमी असल्याचा फटका प्रामुख्याने ऊस क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील ऊस गाळपावर परिणाम दिसून येत आहे. राज्यातच यंदा साखर कारखाने १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास साखर आयुक्तांनी परवानगी दिली. विधानसभा निवडणूक आणि दिवाळीच्या सणामुळे ऊसतोड मजूर आले नाहीत. पर्यायाने साखर कारखाने उशिराने सरू झाले. तर गाळप देखील उशिरापर्यंत सुरु राहील अशी शक्यता होती.

Solapur Crime : घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेतला, सगळे पाहुणे घरी आल्यावर सख्ख्या चुलत भावाने कांड केला

तीन महिनेच चालला गाळप हंगाम

सोलापूर जिल्ह्यात काही साखर कारखान्यांचा अपवाद सोडला, तर बरेच साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत. ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याचे यामागे कारण होते. उशिराने सुरू झालेले साखर कारखाने पूर्ण क्षमतेने न चालताही जानेवारीपासून ऊस अभावी बंद करावे लागल्याचे साखर कारखान्यांकडून सांगण्यात आले. अर्थात यंदा उसाचा गाळप केवळ तीन महिन्यांचाच राहिला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कारखाने

राज्यात सुरू झालेल्या आहे.२०० साखर कारखान्यांपैकी १६ साखर कारखाने ऊसाची कमतरता जाणवत असल्याने बंद झाले आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एक, सोलापूर जिल्ह्यातील १२ आणि धाराशिवचे तीन साखर कारखाने आहेत. प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply