Solapur Crime : घरात कार्यक्रम असल्याचा फायदा घेतला, सगळे पाहुणे घरी आल्यावर सख्ख्या चुलत भावाने कांड केला


Solapur : धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वासाने घर उघडे ठेवल्याने तब्बल ५ लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याने दाखल झालेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या पथकाकडून कौशल्याने तपास केला. यात फिर्यादीच्या चुलत भावानेच चोरी केल्याचे तपासात उघड झालं आहे. पथकाने मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. अनिल शंकर गोलेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

यातील तक्रारदार श्रीकांत बाबू गोलेकर यांचा चुलत भाऊ अनिल गोलेकर याच्या घरी २२ जानेवारी रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने, यातील फिर्यादी आणि त्यांचे नातलग अनिलच्या सोनीनगर येथील घरी ये-जा करीत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्या घराला कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते. या कार्यक्रमादरम्यान २२ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या घरात ठेवलेले पत्र्याच्या पेटीतील सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

Mumbai Local News : मुंबईच्या महिला लोकल डब्यात मोबाईलचा स्फोट, धुराचे लोट आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

गुन्हा करणारा निश्चित होताच पथकाने सापळा रचून आरोपी दागिने विक्रीसाठी जाताना त्याला ७ फेब्रुवारी रोजी मुद्देमालासह मोदी स्मशानभूमी येथून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता फिर्यादीच्या घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.

दरम्यान, अशीच काहीशी घटना दोन दिवसांपूर्वी महाकाली शीतला देवीच्या मंदिरात घडली. मंदिरातील दानपेटी चोरट्यांना फोडता न आल्याने दोघांनी आपली शक्कल लढवत चक्क दानपेटीच उचलली. या चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत चोरट्यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही चोर हे अल्पवयीन असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply