Sindhudurg News : नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत

Sindhudurg News : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात  शिकणाऱ्या तब्बल 133 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आज (शनिवार) शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चाैकशी करणार आहेत अशी माहिती सरपंच लवू भिंगारे यांनी दिली. 

सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. दरम्यान नाष्टा करण्यासाठी वापरलेले बटाटे निकृष्ट दर्जाचे हाेते अशी शंका शाळेतील शिक्षकांनी बाेलून दाखवली.

Jalana IT Raid : २० पथके, तब्बल १५० अधिकारी, अन् तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी; जालन्यात काय घडतयं?

आज शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे सावंतवाडी दाै-यावर आहेत. ते सांगेलीतील नवोदय विद्यालयास भेट देणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले.

सांगेली नवोदय विद्यालयात सकाळी नाष्टा केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. दरम्यानच्या काळात त्रास हाेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. यामुळे शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना दवाखान्यात नेण्याचा निर्णय घेतला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply