Shocking News : अरे बापरे! पोलीस ठाण्यातील शासकीय पैशांवर पोलिसानेच मारला डल्ला; कुठे घडला हा प्रकार?

Shocking News : छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडे फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. विविध घटना उघडकीस आल्या आहेत. फसवणूक झाल्यानंतर आपण पोलिसांकडे जातो. त्यांची मदत घेतो. सामान्य नागरिकांसाठी पोलीस अधिकारी हे मोठं आधाराचं ठिकाण आहे. पण जर या सरकारी अधिकाऱ्यांनीच फसवणूक केली तर, कधी विचार केलाय का? असा विचार करायला लावणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर येत आहे. ही घटना नक्की काय आहे, ते आपण जाणून घेऊ या. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या बँक खात्यातून एका सहाय्यक फौजदाराने 3 लाख रूपये काढल्याची घटना घडली आहे. पोलीस ठाण्याच्या शासकीय पैशांवरच फौजदाराने हल्ला केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

Parbhani News : परभणीत आजपासून बससेवा सुरळीत, दाेन दिवसांत एसटी महामंडळाचे 65 लाखांचे नुकसान

शासकीय निधीत अफरातफर

पोलीस ठाण्यातील बँकेच्या व्यवहारांची जबाबदारी असलेल्या सहाय्यक फौजदारानेच बँक खात्यातून 3 लाख 4 हजार रुपये परस्पर काढले आहेत. या प्रकरणी शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रामदास शांताराम गायकवाड, असं या फसवणूक करणाऱ्या सहाय्यक पदाधिकाऱ्याचं नाव आहे.

पोलीस ठाण्याचा मेंटेनन्स, तपासासाठी लागणारा निधी, लाईट बिल असा खर्च मोहरील फंडातून केला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या या व्यवहारांची सहाय्यक फौजदार रामदास शांताराम गायकवाड यांच्याकडे होती. ते एप्रिल २०२१ पासून हे व्यवहार सांभाळत होते. तेव्हापासूनच त्यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यातून शासकीय निधी काढून घेतला  होता. त्याची कुठेही नोंद केली नव्हती. ते हा निधी परस्पर वापरत होते.

शासकीय पैशांचा वैयक्तिक खर्चासाठी वापर

नवनियुक्त पोलीस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला. त्यामध्ये त्यांना अनियमता आढळून आली. त्यानंतर एकूण संपूर्ण प्रकार समोर आला आहे. त्यांनी एकूण निधीतील ३ लाख ४ हजार रूपये वैयक्तिक खर्चासाठी वापरले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक देवकते करत आहेत.

सहाय्यक फौजदाराने शासकीय पैशांचा वैयक्तिक खर्चासाठी वापर केल्याचं संभाजीनगरमधून समोर आलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. जर रक्षकच भक्षक बनत असतील, तर सामान्य जनतेचं काय होणार असा प्रश्न निर्माण होताना दिसतोय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply