Shivsena MLA Disqualification : ''मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा अन् पंतप्रधानांचा रोड शो..'' संजय राऊतांनी निकालाआधीच लावला तर्क

Shivsena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रतेसंबंधी बुधवारी चार वाजता महत्त्वपूर्ण निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत आमदार अपात्रतेसंबंधी निकाल येणं अपेक्षित आहे. अपात्रतेची कारवाई शिंदे गटावर होते की ठाकरे गटातील आमदारांवर, हे कळेलच.

विशेष म्हणजे विधानभवनात पोहोचण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यघटनेच्या अनुसूची १० मधील कलमांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलं आहे. आज निर्माण झालेली परिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नसल्याने ज्या कायद्यांचं इंटरपिटीशन आजपर्यंत झालेलं नव्हतं त्यांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलं आहे.

Lok Sabha Election : लोकसभेसाठी पुण्यात काँग्रेसकडून वीस जण इच्छुक

दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा आणि पंतप्रधानांचा रोड शो.. या मुद्द्यांचा आधार घेऊन निकाल काय येईल, यासंबंधीच तर्क लावला आहे. ''आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे, निर्णय दिल्लीतून झालेला आहे.. फक्त शिक्का मारणं बाकी आहे. मुख्यमंत्री दावोसला जाणार आहेत, प्रधानमंत्री रोडशोच्या दौऱ्यावर येत आहेत; मुख्यमंत्री दावोसला जात आहेत, कारण त्यांना निर्णय माहित आहे.'' असा अंदाज राऊतांनी बांधला.

''राहुल नार्वेकर हे न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत, ते तटस्थ राहिले पाहिजेत. त्यांचा प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासंदर्भात सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाहीत. पण हे मेसेज डेट आणि मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये जातात.'' असा आक्षेप राऊतांनी घेतला.

काय म्हणाले संजय राऊत?

  • शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकादेशीर आहे

  • नाईलाजाने औपचारिकता म्हणून आज निर्णय दिला जाणार आहे

  • निर्णयाची मॅच फिक्सिंग दिल्लीतून झालेली आहे

  • मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा फायनल झाल्याने निर्णयाचा अंदाज येतोय



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply