Shivsena : उद्धव ठाकरे यांचा उद्या पक्षप्रमुख पदाचा शेवटचा दिवस? ठाकरे गटात खलबतं; आज होणार बैठक?

उद्धव ठाकरे यांच्यासमोर जसा पक्षचिन्हाचा वाद आहे. तसाचं पक्षप्रमुख पदाचा देखील पेच निर्माण झाला आहे. पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय ३० जानेवारीला होऊ शकतो. पण पक्षप्रमुख पदाबाबतचा संभ्रम कायम आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांनी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी आयोगाला विनंती केली किंवा सद्यस्थिती कायम ठेवावी, अशी विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे, मग यानंतरही ते पक्षाचे अध्यक्षपद कायम ठेवणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजेच उद्या (२३ जानेवारी रोजी) उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदतही संपुष्टात येत आहे. यामुळे २३ जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळासमोर आहे. यासंदर्भात रविवारी शिवसेनेकडून मोठी घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार २३ जानेवारी २०१८ रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे ५ वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी पुर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर ३० जानेवारीला सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दोन सुनावणी झाली आहे. आता लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश आयोगाने दोन्ही गटांना दिले आहे.

या दरम्यान पक्षातंर्गत निवडणुका घेऊ देण्याची मागणी ठाकरे गटाने आयोगाकडे केली होती. परंतु आयोगाने त्यावर कोणताही निर्णय दिला नाही. शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्याने तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नसणार आहेत.

पक्ष प्रमुखाची मुदत संपत असल्याने २३ जानेवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची (प्रतिनिधी सभा) बैठक बोलावायची का, यावर गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटात चर्चा सुरु होत्या. मात्र पक्षातील नेत्यांमध्ये त्यावर एकमत नाही. आता २२ जानेवारी रोजी शिवसेना भवनात बैठक होणार असून, त्यात पक्षप्रमुखासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply