Shivsena : 'पैशांच्या व्यवहाराशिवाय बाई काम करत नाही', ठाकरे गटाच्या नेत्याचा गोऱ्हेंवर गंभीर आरोप

Shivsena : शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर दोन ''मर्सिडीज'' दिल्यावर पद मिळतं,असा गंभीर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपानंतर ठाकरे गट आक्रमक झाले. खासदार संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दात नीलम गोऱ्हे यांचा समाचार घेतला. तसेच विनायक पांडे यांचं नाव घेत राऊत यांनी खुलासा केला.

यावर ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांनी स्पष्टीकरण देत मोठा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणुकीला निलम गोऱ्हे यांनी पैसे घेतले असल्याचा गंभीर आरोप पांडे यांनी केला आहे.

''माझ्या राजकीय प्रवासात, शिवसेनेचा शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपमहापौर आणि महापौर होतो. उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्याकडून पदासाठी कधीही पैसे घेतले नाहीत. शिवसेनेनं मला भरभरून दिलंय, असं विनायक पांडे म्हणाले.

Pune Crime : ८ जणांनी कोयता अन् तलवारीने सपासप वार केले, तरूणाचे हात-पाय तोडले, मध्यरा‍त्री कोथरूडमध्ये थरार

तसंच नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 'विधानसभा निवडणुकीला नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते. माझ्सासारखे अनेक कार्यकर्ते पुढे येतील, या बाईंनी त्यांच्यासोबत काय - काय केलं ते सांगतील', असंही विनायक पांडे म्हणालेत.

'गोऱ्हे यांनी त्या ठिकाणी मराठी साहित्याविषयी भूमिका मांडायला होती. मराठी साहित्य संमेलनाच व्यासपीठ त्यासाठी नव्हतं. त्या बाईंना भूमिका मांडता येत नाही. मला त्यांची कीव येते', असंही विनायक पांडे म्हणाले.

स्पर्धेचा फायदा

'या मतदारसंघात मी आणि अजय बोरस्ते होतो. स्पर्धेचा लोक फायदा उचलतात. नीलम गोऱ्हे यांनी १०० टक्के तिकीट देतो असं सांगितलं होतं. उमेदवारी देण्यासाठी नीलम गोरे यांनी पैसे मागितले होते. पैसे दिले पण उमेदवारी अजय बोरस्ते यांना मिळाली.

मला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून मी पैसे परत मागितले. अनेक दिवस त्या पैसे परत देत नव्हत्या, त्यांना मी पत्रकार परिषद घेऊन सगळं सांगेन अशी धमकी दिली तेव्हा त्यांनी पैसे दिले', असा खुलासाही पांडे यांनी केला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply