Shivrajyabhishek Sohala 2023 : ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा दिमाखात साजरा; रायगडावर शिवप्रेमींची तुफान गर्दी

350th Shivrajyabhishek Sohala : राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याची लगबग सुरु आहे. आज (6 जून) रोजी तारखेनुसार ३५० वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्यामुळे राज्यात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ढोलताशांच्या गजरात प्रत्येक ठिकाणी शिवराज्यभिषेक साजरा केला जात आहे. 

स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. त्या सुवर्ण दिनाची स्मृती कायम राहावी, या उद्देशाने अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहाने साजरा होत आहे. या सोहळ्याला दरवर्षी प्रमाणे हजारो शिवभक्त रायगडावर उपस्थित झालेत.

रायगडावर उफाळली गर्दी

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा रायगडावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस आणि प्रशासनासमोरचं आव्हान ठरत आहे.

रायगडवरील कार्यक्रमाचे नियोजन

सकाळी ७ वाजता – युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे शुभहस्ते ध्वजपूजन.

सकाळी ७.३० वाजता – शाहिरी कार्यक्रम.

सकाळी ९.३० वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन.

सकाळी ९.५० वाजता – संभाजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजीराजे छत्रपती यांचे आगमन.

सकाळी १०.१० वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवाजी महाराजांना अभिषेक.

सकाळी १०.२० वाजता – शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक.

सकाळी १०.३० वाजता – छत्रपती संभाजी महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन.

सकाळी ११ वाजता – शिवाजी महाराजांची पालखी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाईल.

दुपारी १२.१० वाजता – शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply