Shivneri Fort : मोठी बातमी! किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Pune : पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे. पुण्यातील किल्ले शिवनेरी गडावर तटबंदीचा कडा कोसळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर किल्लाच्या तटबंदीचा बुरुजही कोसळला आहे. यानंतर शिवनेरीवर जाताना पर्यटकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जुन्नर वनविभागाने आवाहन केलं आहे.

Mumbai : मुंबईच्या विक्रोळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघेजण होरपळले

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील किल्ले शिवनेरीच्या गणेश दरवाजाच्या वरील बाजुचा कडा खाली कोसळल्याने भातखळा तटबंदीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या गडकिल्ल्यांवर ३१ जुलैपर्यंत जमावबंदी लागू आहे. तरीही पर्यटक किल्ले शिवनेरीवर येत आहे. त्यामुळे किल्ल्यावर कडा कोसळण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जुन्नर वनविभागाने केले आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply