Shiv Jayanti 2023: आग्र्याच्या किल्ल्यात 'दिवाण-ए-आम'मध्ये होणार शिवजयंती; CM शिंदेंनी केलं मोठं आवाहन

मुंबई : आग्र्यातील लाल किल्ल्यात साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला होता. औरंगजेबानं त्यांना भेटण्यास नकार दिला होता, अशा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये या वर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं भाग्य तमाम शिवप्रेमींना मिळणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शिवप्रेमींना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

CM शिंदे म्हणाले, आग्र्यातील लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी होत आहे, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी, केंद्रीय सांस्कृतीक विभागाचे मंत्री रेड्डी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे आभार मानतो की त्यांनी आमची विनंती त्यांनी मान्य केली.

शिवरायांना अपमान सहन कराव्या लागलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात आजपर्यंत कधीही शिवजयंती साजरी झाली नाही. त्याच लाल किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये साजरी करण्याचं भाग्य मिळतंय ही आनंदाची बाब आहे. त्यामुळं सर्व शिवप्रेमींना मी आवाहन करतो की या ऐतिहासिक घटनेचे सर्वजण साक्षीदार व्हावं. आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशातील सर्वच शिवप्रेमींसाठी ही फार अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे, असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply