Shirur Lok Sabha Election 2024 : हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Shirur Lok Sabha Election 2024 : राज्यात बारामतीनंतर सर्वाधिक चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर. बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजित पवारांनी  ठाण मांडलं ते शिरूरमध्ये. कारण गेल्यावेळी घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या अमोल कोल्हेंनी यावेळी तुतारी हातात घेतली. त्यामुळे अजितदादांनी शिरूरची लढाई प्रतिष्ठेची केली आणि यामधील रंगत वाढली.

शिरूर  लोकसभेत 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातल्या चार ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी आणि शिरूर यात 2019 मध्ये अमोल कोल्हेंना लीड मिळाला होता. तर शहरी भाग असलेल्या भोसरी आणि हडपसर या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आघाडी कायम राखली होती.

Mumbai News : नववीत शिकलेल्या युवकाचा बनावट नोटांचा छापखाना, पाेलिसांच्या धाडीत 2 लाखांच्या नाेटा जप्त

2019 मध्ये आढळराव पाटील यांना भोसरीतून 37 हजार 77 मतांचं लीड मिळालं होतं. तर हडपसरमधून केवळ 5 हजार 370 मतांचं लीड मिळालं होतं. मात्र 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये हडपसर विधानसभेतून शिवाजीराव आढळराव पाटील यांचं लीड अमोल कोल्हेंनी[अवघ्या 5 हजारावर आणलं होतं. यंदा हडपसरमध्ये तब्बल 5 टक्क्यांनी मतदान कमी झालंय. त्यामुऴे घटलेल्या मतदानाचा फटका कुणाला बसणार याबाबत उत्सुकता आहे.
 
तर दुसरीकडे हडपसर विधानसभेत सव्वा लाख मुस्लिम मतदार तर 70 हजारांवर माळी समाजाचे मतदार आहेत. या मतांचं ध्रुवीकरण झालं तर आढळरावांचा विजय खडतर होऊ शकतो. त्यामुळे हडपसरच शिरूरचा खासदार ठरवणार असल्याचं चित्र आहे. दरम्यान, या या मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव अढळराव पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता या मतदारसंघामध्ये कोण जिंकून येईल हे येत्या ४ जून रोजी कळेल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply