Shirur Accident : पुणे- नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात; गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एकाचा मृत्यू

Shirur Accident : पुणे- नाशिक महामार्गावर पेठ गावच्या हद्दीत दोन विचित्र अपघात झाले. या दोन्ही अपघातातील एका अपघातात मालवाहू गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. 
 
शिरूर तालुक्यातील आरणगाव येथील अल्पवयीन मुलीने एका तरुणाला चिरडल्याची घटना ताजी असताना पुणे- नाशिक महामार्गावर  शुभम दातखिळे हा अल्पवयीन तरुण मालवाहू पिकअप जीप घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता. या दरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या पिकअप महामार्गाच्या डिव्हाडरला धडकून अपघात झाला. यामध्ये अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या गाडीमध्ये बसलेल्या नवनाथ दातखिळे याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर अल्पवयीन पिकअप ड्रायवर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
दुसऱ्या अपघातात  मालवाहू ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात ट्रकमध्ये भरलेल्या लोखंडी पट्ट्या महामार्गावर पडल्या. या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply