Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

Shirpur Police : दारू विक्री व वाहतुकीस बंदी असताना सर्रासपणे दारूची अवैधरित्या वाहतूक केली जाते.अशा प्रकारे मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पिकअपमधून वाहतूक केली जात असलेली पावणेतीन लाख रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला.

शिरपूर शहर पोलिस  ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना इंदूरकडून धुळे  शहराच्या दिशेने पिकअप वाहनमधून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून शोध पथकाच्या अंमलदारांनी शिरपूर टोलनाका येथे सापळा रचला. दरम्यान संशयित वाहनाला थांबविण्याचा इशारा केल्यानंतर चालकाने भरधाव पिकअप पळविली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत  तापी नदीवरील पूल ओलांडल्यानंतर गाडीचे टायर फुटल्याने त्याने कच्च्या रस्त्यावर वाहन उतरविले. 

Lok Sabha Election : महायुतीच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार? आठवलेंना डावलल्याने RPIचे कार्यकर्ते आक्रमक, दिला मोठा इशारा

काही अंतरावर वाहन उभे करून तो पळून गेला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कांद्यांच्या गोण्यांच्या आडोशाला १०० खोक्यांमध्ये भरलेले दारूचे अर्धा लिटरचे टिन आढळले. वाहनासह या मुद्देमालाची एकूण किंमत सात लाख ८८ हजार रुपये आहे. पोलिसांनी संशयित चालकाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply