Shirish Maharaj : संवेदनशिलता! शिरीष महाराजांचे कर्ज एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात फेडलं, मोरे कुटुंबाला 32 लाखांची मदत

Shirish Maharaj More : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी तीन दिवसांपूर्वी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. त्यांनी आयुष्य संपवण्याआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कुणाला किती पैसे देणे बाकी असल्याचा उल्लेख केला होता. आता राज्यातील सांवेदनशील नेते म्हणून परिचित असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत. मोरे यांच्यावर असलेले 32 लाखांचे कर्ज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेडलं आहे.

आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन् कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. अख्खं आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी शिंदेंनी हे पाऊल उचललं. आमदार विजय शिवतारेंनी महाराजांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. पाच फेब्रुवारीला देहूतील राहत्या घरी शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली अन् वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली अन् त्यांनी ही याबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.

Bangladeshi People Arrested : बेकायदेशीर देशात राहणाऱ्या १६ बांगलादेशींना अटक, मुंबईसह उपनगरात पोलिसांची छापेमारी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी राजी वाढदिवस होता. शिंदे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत मोरे कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोरे कुटुंबंला मोठा दिलासा जरी मिळाला असला तरी मुलगा गेल्याचे दुःख त्यांच्या मनात आहे. एकनाथ शिंदे यांनी ३२ लाख रूपयांची मदत मोरे कुटुंबियांना केली. आमदार विजय शिवतारे यांनी ही मदत रविवारी संध्याकाळी मोरे कुटुंबियांपर्यंत पोहचवली.

प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी टोकाचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जाण्याने फक्त वारकरी संप्रदाय नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आत्महत्या कारण्याअगोदर महाराजांनी माझे कर्ज फेडण्यासाठी मित्रांनी कुटुंबियांना मदत करावी, असे आवाहन केले होते. एकनाथ शिंदे यांनी त्या आवाहानाला दाद देत मदतीचा हात दिलाय.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply