Shirdi Police : शिर्डीत भिक्षा मागणाऱ्या १२ मुलांची सुटका; पालकांवर गुन्हा दाखल

Shirdi : लहान मुलांना भिक्षा मागायला लावाल तर आता जेलची हवा खावी लागणार आहे. यातच शिर्डी पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या १२ लहान मुलांची सुटका केली असून त्यांच्या पालकांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईने धार्मिक स्थळी भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे.

लहान मुलांना रस्त्यावर उभे करून भिक्षा मागायला लावली जात असते. प्रामुख्याने मोठे धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी मंदिरांच्या बाहेर भिक्षा भिक्षा मागणाऱ्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत असते. या भिक्षा मागणाऱ्यांमध्ये लहान मुले नजरेस पडत असतात. दरम्यान शिर्डीत भिक्षेकऱ्यांची वाढलेली संख्येचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना आता भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा सर्रास वापर होत असल्याचं समोर आलाय.

पालकांवर गुन्हा दाखल

साईंच्या दारात दररोज दिसणारे हे वास्तव बदलण्यासाठी आता शिर्डी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये पोलिसांनी भिक्षा मागणाऱ्या १२ मुलांची सुटका केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिर्डीत आता मुलांकडून भिक्षा मागण्याच्या प्रकाराला चाप बसणार आहे. तर पोलिसांकडून देखील आणखी शोध मोहीम सुरूच आहे.

मुलांची आधारगृहात रवानगी

बालकल्याण समितीने पोलिसांनी सुटका केलेल्या या सर्व मुलांची रवानगी संगमनेर आणि श्रीरामपूर येथील आधारगृहांमध्ये केली असून तिथे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरी आणि बालभिक्षेकरी प्रवृत्तीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *