Shirdi crime news : दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली, साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला


Shirdi crime news : दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली आहे. शिर्डीतील साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर आणि एका तरूणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला असून, या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भल्या पहाटे हा हल्ला घडल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

भल्या पहाटे शिर्डीमध्ये तीन जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. साई संस्थानचे दोन कर्माचारी पहाटे ड्युटीवर जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तसेच शिर्डीतील एका तरूणावर देखील प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करत आरोपीने हल्ला चढवला. या हल्ल्यात सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कुष्णा शेजुळ या साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, कृष्णा देहरकर याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. शिर्डीत तिघांवर चाकूने वार झाल्याने एकच खळबळ उडाली असून, संतापलेल्या नागरीकांनी पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Crime News: गुन्हा केला एकाने मार खाल्ला दुसऱ्यांनी, बांगलादेशी समजून ४ मित्रांना भिवंडीत बेदम मारहाण

शिर्डीत दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रूग्णालयात जात मृत व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. तसेच या प्रकरणी कोणत्याही पोलिसांनी हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. मोफत अन्नछत्राप्रमाणे, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचं विखे पाटील म्हणाले. हे प्लांट मर्डर वाटत नाहीत. हे नशेखोरांचे कृत्य आहे. दुपारपर्यंत आरोपी ताब्यात असतील, असा दावाही विखे पाटलांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply