Shindkheda News : कॉलेजची बॅग, आधारकार्ड पुलावर ठेवून तरुणीची तापी नदीत उडी

Shindkheda News : शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील महाविद्यालयीन तरूणीने गिधाडे (ता.शिरपूर)  येथील तापी नदीवरील पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना २४ डिसेंबरला घडली.  शिंदखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू्ची नोंद करण्यात आली आहे.

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील गायत्री तुळशीदास लोहार (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. गायत्री हिने कॉलेजची बॅग व आधार कार्ड तसेच चप्पल असे साहित्य गिधाडे येथील तापी पुलावर पडलेले असल्याचा निरोप तिचे काका प्रमोद लोहार यांना मिळाला. यानंतर गावातील तुळशीदास बागले, संजय देसले, गिरीश देसले असे काहीजण तापी पुलावर जावुन खात्री केली असता सदर वस्तु गायत्री हिचे असल्याचे लक्षात आले.  

Kunabi Certificate : पैसे द्या आणि कुणबी दाखला घ्या? एजंट अन् तरुणाच्या संवादाची ऑडिओ क्लीप VIRAL

यानंतर सावळदे येथील पोहणाऱ्यांनी गायत्रीचा तापी नदीच्या पाण्यात शोध घेतला असता गायत्री ही तापी नदीच्या पाण्यात मिळुन आली. तिचा मृतदेह बाहेर काढुन शिंदखेडा येथील ग्रामिण रुग्णालय नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी मृत घोषीत केले.  घटनेची खबर तीचे काका प्रमोद काशीनाथ लोहार यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिल्याने अकस्मात मृत्यू्ची नोंद करण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *