Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची?, पवार विरूद्ध पवार, अपात्रतेबाबतची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपताच, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपात्रतेच्या सुनावनीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेच्या अपात्रतेच्या सुनावनीवेळी रंगलेला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही पहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना पात्र अपात्र सुनावणी जवळपास ३ महिने चालली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अध्यक्षांनी अधिवेश काळात दोन्ही गटाच्या बाजू एकूण घेतल्या, ही सुनावणी संपत नाही तोच आता अध्यक्षांना १ महिन्यात राष्ट्रवादी नेमकी कुणाचीहा प्रश्न निकाली काढायचा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेची सुनावणी सुरू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदेंना दिलं होतं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण अद्याप निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेताना अध्यक्षांना तारेवरची कसरत करावी लागू शकते.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ५०० ट्रॅक्टर्सची भव्य रॅली; ४२ आंदोलकांवर गुन्हा दाखल

शरद पवार उपस्थित राहिले तर

ठाकरे गटाने  सुप्रीम कोर्ट त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे या दोन्हीही ठिकाणी अनुपस्थित होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार हे निवडणूक आयोगाच्या सुनवणीवेळी त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळे एक वेगळा दबाव पाहायला मिळाला होता. स्वतः शरद पवार सुनावणीवेळी उपस्थित राहिले तर अध्यक्षांवर ही तोच दबाव पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पात्र पात्रतेच्या सुनावणीवेळी दोन्ही पवार जरी एकमेकांसमोर उभे राहिले असले तरी यातून मार्ग काढताना अध्यक्षांची मात्र तारेवरची कसरत पाहायला मिळू शकते.

अजित पवार गटाची आज मुंबईत मॅरेथॉन बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली. सोशल मीडिया सेल आणि पक्षातील प्रवक्त्यांची ही बैठक होती. सोशल मीडिया सेलच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सोशल मीडियावरून पक्षाचा जास्तीत जास्त प्रचार आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार प्रसारित करण्यात यावा. त्याचसोबत गावपातळीवर सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी सूचना या बैठकीत देण्यात आली आहे.

अजित पवार गटातील दुसरी बैठक ही पक्षातील प्रवक्त्यांची घेण्यात आली आहे. या बैठकीत प्रवक्त्याना सूचना देण्यात आली आहे की,जो कोणी विरोधक पक्ष आणि आपल्या पक्षातील नेत्यांवर कडाडून टीका करत असेल तर त्यांच्या विरोधात प्रवक्ते म्हणून तुम्ही आक्रमक भूमिका मांडणे. त्याचसोबत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात बोलणं टाळावं. जर युतीतील काही वाद असतील तर त्या वादावर पक्षातील नेते हे भूमिका मांडतील. नवाब मलिक यांच्या संदर्भात प्रवक्त्यांनी कोणतीही बाहेर भूमिका मांडू नये, तो विषय बाहेर टाळावा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply