Sharad Pawar Retirement : साहेब निवृत्ती घेऊ नका, नेते रडले, पाया पडले, घोषणाबाजी; शरद पवारांच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भावुक

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात भाषण करताना शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.

कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे,असं म्हणत शरद पवार यांनी आपल्या अध्यपदावरुन निवृत्तीची घोषणा केली. शरद पवार यांच्या घोषणेनंतर सभागृहात जमलेल्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. अनेक बड्या नेत्यांनी स्टेजवर जात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. साहेब आपली घोषणा मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्ते करत आहे.

मेहबूब शेख, अंकुश काकडे यांना देखील अश्रू अनावर झाले. धनंजय मुंडे यांनी तर शरद पवार यांचे पाय धरुन त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.

गेली २४ वर्ष मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून काम करत आहे. राज्यसभेची माझी तीन वर्ष राहिली आहेत. मी आता निवडणूक लढवणार नाही. कुठे तरी थांबायचं विचार केला पाहिजे. आपण मला खंबीर साथ दिली हे मी विसरू शकत नाही, असंही शरद पवारांनी म्हलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply