Sharad Pawar On Pm Modi : नेहरूंबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले, ते योग्य नाही : शरद पवार

Sharad Pawar On Pm Modi : पंतप्रधान यांचं भाषण ऐकल्यावर मला दुःख झालं. पंतप्रधान देशाचे पंतप्रधान असतात, कुठल्या एका पक्षाचे नाही. असं शरद पवार म्हणाले आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''आपण पंडित नेहरू यांनी केलेल्या कामांकडे डोळेझाक करू शकत नाहीत. त्यांनी देशासाठी काम केलं. देशात सुरू झालेली लोकशाही, तिला ताकद देण्याचं काम नेहरूंनी केलं. देशाचा चेहरा बदलण्याचं काम नेहरूंनी केलं. त्या योगदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले ते योग्य नाही. नेहरू, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगल काम केलं आहे.'' 

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीआधी देशात मोठी उलथापालथ! 15 माजी आमदार आणि खासदारांनी केला भाजपमध्ये प्रेवश

शरद पवार म्हणाले आहेत की, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणता आलं पाहिजे. आपला लोकशाहीचा अधिकार मजबूत राहिला पाहिजे. भाजपच सरकार सत्तेत आल्यावर विचारधारेसाठी काम करत आहे. लोकांच्या समस्येवर नाही. मी 1 तास पंतप्रधान यांचं भाषण ऐकलं, त्यात फक्त काही लोकांच्या हिताच रक्षण ते करतील, असं दिसतंय.  

दरम्यान, राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी याप्रकरणी आपला निर्णय जाहीर करत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिलं आहे. तर आता शरद पवार गटाला स्वतंत्र पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांना आता नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाला कळवावे लागणार आहे.

यातच आता माहितीस समोर आली आहे की, शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगात पक्षासाठी 3 नावे देण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या नावाला पहिलं प्राधान्य शरद गटाचं असल्याचं सूत्रंनीस सांगितलं आहे. इतर दोन नावात देखील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply