Sharad Pawar on Narendra Modi : मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवार या वयात स्वतः चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी एका मुलाखतीतून केली होती. या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी आज शनिवारी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदींची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पण त्यांनी असं व्यक्तिगत बोलू नये, असं पवारांनी म्हटलं आहे.

Avinash Jadhav : अविनाश जाधवांची पोलिसांसमोर सराफा व्यापाऱ्याच्या मुलाला कानफटवलं,

व्यक्तिगत टीका करण्याचं पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण मीही हे पथ्य पाळू नये, ही भूमिका काही योग्य होणार नाही, असे भाष्य शरद पवार  यांनी केले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत लोकांची उपस्थिती आणि त्यांचा प्रतिसाद पाहिला तर परिस्थिती वेगाने बदलत असल्याचं दिसून येतंय, असंही पवार म्हणाले.

५ वर्षांपूर्वी मोदी यांनी मतदारांना जी आश्वासने दिली होती, ती अजूनही पूर्ण केलेली नाही. राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. त्यांची नाराजी पाहता या सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागणार, असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे.

मोदी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र, त्या पूर्ण केल्या नाहीत. परिणामी लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसत आहे. मोदींकडून केवळ टीका टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे यांचं काही खरं नाही, असं लोकांना वाटत आहेत, असंही पवार म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. ते जेव्हा अडचणीत येतील, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख काहीही म्हटलं असलं तरी आमची प्रार्थना आहे की, उद्धव ठाकरेंना यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply