Sharad Pawar : पोलिसांच्या कारमधून रसद पुरवली जाते, अधिकाऱ्यांचा दाखला देत शरद पवारांचा महायुतीवर गंभीर आरोप

Sharad Pawar : नाशिकच्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नेते शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. 'या सरकारचं वैशिष्ट्य आहे. विमानाने एबी फॅार्म पाठवले. पोलिस दलाच्या गाड्यातून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे.'असा गंभीर आरोप ⁠शरद पवार यांनी केला आहे. तसंच, 'मी जाहीर पणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या आधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये अशी गळ घातली आहे.' असे देखील पवारांनी सांगितले. बारामतीमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

शरद पवार यांनी रश्मी शुक्ला यांच्याबाबत देखील मोठं वक्तव्य केले आहे. 'राज्याच्या प्रमुखाबद्दल जाहीरपणे मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं. ⁠सरकारची जबाबदारी आहे. त्यांच्या मागचे सत्य शोधून काढणे. त्यांनी काय काय उद्योग केले आहेत. त्याच्या अनेक चर्चा आहेत.' यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. त्यांनी सांगितले की, '⁠राज ठाकरे यांनी टीका करणे, बोलणे या शिवाय दुसरं काही केलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना एकच जागा निवडून दिली.'

Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. यावरून विरोधक त्याच्यावर टीका केली जात आहे. संजय राऊत यांच्यानंतर आता शरद पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 'राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना आधीची सुरक्षा आहे. त्यात आणखीन केंद्र सरकारची सुरक्षा देत असेल तर राज्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे.' असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

तसंच, 'प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आजचा दिवस आनंदाचा असतो. ⁠महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, हेच मागणं आहे. ⁠महाराष्ट्रातील आजच्या स्थितीची चिंता वाटते, ⁠परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे. ⁠केंद्र सरकारच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्र पहिल्याच पाच राज्यात नाही. उत्पादनात महाराष्ट्र मागे गेला आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply