Sharad Pawar News : कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात; मुंबई- आग्रा महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन

Sharad Pawar News  : प्रारंभी निर्यातशुल्क आणि नंतर कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने आता कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार आहे.

World Human Rights Day : जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त 'जागर मानवी हक्काचा' या कार्यक्रमाचे आयोजन

कांदा प्रश्नी शरद पवार रस्त्यावर...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्र सरकारने कांद्यावर लादलेल्या  निर्यातबंदी विरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. आज (सोमवार, ११ डिसेंबर) शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको... 

निर्यातबंदीसह कांद्याबाबतच्या केंद्र सरकारच्या धरसोड धोरणांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बऱ्याच वर्षानंतर शेतकरी आंदोलनात स्वतः शरद पवार उतरणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, पवार यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान 'महाराष्ट्राचा 83 वर्षांचा तरुण योद्धा' अशा पद्धतीचे बॅनर सध्या नाशिकमध्ये झळकत आहेत.

आज दिल्लीत महत्वाची बैठक...

दरम्यान, एकीकडे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळिराजा चिंतेत असतानाच  केंद्र सरकारने  कांदा निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत कांदा निर्यात बंदीवर दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकचे कांदा व्यापारीही उपस्थित राहणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply