Sharad Pawar Advice : काही करा, पण जमिनी विकू नका; शरद पवार यांचा शेतकऱ्यांना सल्ला; पुणे-मुंबईकरांचं नाव घेत म्हणाले...

Sharad Pawar Advice : काही करा मात्र जमिनी विकू नका, असा सल्ला शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. शरद पवार हे दुष्काळ दौऱ्यावर असून आज बारामती येतील मोरगाव येथे उपस्थित लोकांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले आहेत की, ''पुणेकर मुंबईकर येतील पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो, तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल, तर त्याला गावात येऊ देऊ नका.''

Pune Airport : धावपट्टीचा होणार 'ओएलएस' सर्व्हे; पुणे विमानतळ, मंत्री मोहोळ घेणार राजनाथ सिंह यांची भेट

गावातील नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ''मला आठवतंय की एकदा पिंपळी आणि आजूबाजूची लोकं मला भेटायला आली. त्या भेटीमध्ये द्राक्षाला काही किंमत मिळत नाही, असा प्रश्न माझ्याकडे मांडला. त्यावेळी मी विचार केला की द्राक्षावर प्रक्रिया करण्यासाठी काही करता येईल का? जगामध्ये चौकशी केली. जगामध्ये वायनरी केली जाते आणि म्हणून इथे वायनरी करायचा आम्ही निकाल घेतला. तुमच्यातल्या कदाचित जुन्या लोकांना माहित असेल इटली वरून त्याचे तज्ञ इथे आले. त्या सगळ्यांनी पहिल्यांदा इथे वायनरी टाकली. त्याच्यात 50 टक्के इथले शेतकरी भागीदार आणि 50 टक्के इटलीचे भागीदार. काही दिवस चाललं पुढे ते यशस्वी झालं.''

शरद पवार म्हणाले म्हणाले, ''या क्षेत्रातले एक मोठे गृहस्थ होते. त्यांचे नाव मोरया. त्यांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की पिंपळीचा कारखाना तुम्ही घ्या, वाढवा. मला दोनच गोष्टी पाहिजे एक द्राक्षाला मार्केट आणि दोन हाताला काम. ते हाताला काम करत असताना दोन प्रकारचे लोक त्या ठिकाणी होते. एक महिला होती आणि पुरुषही होते. या दोन्ही गोष्टी त्यांनी माझ्या मान्य केल्या. द्राक्षाला मार्केट आलं.

ते म्हणाले, ''उसाच्या गाड्या जातात ताशा द्राक्षाच्या गाड्या येऊन तिथे माल टाकत होते. काही अडचणी आहेत, मध्यंतरी तुमच्यापैकी काही लोक मला म्हटले इथे द्राक्ष घालायला मी लावली असती पण ते प्रश्न सोडवायला आणखी काही करायची गरज आहे. एक दिवशी बसून आपण त्यातून मार्ग काढू.''

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply