Sharad Pawar : पवारांनी घेतला लोकसभा मतदार संघांचा आढावा; जागा वाटपाची बैठक दसऱ्यानंतर

Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी माहीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यावेळी १५ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. उर्वरित मतदार संघाचा आढावा लवकरच घेण्यात येणार आहे असही ते म्हणाले.

यावर सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आढावा बैठकीमध्ये दिंडोरी, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, चिपळूण, शाहापूर, जालना, कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

Pune Accident News : वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली; दैव चांगले म्हणून तिघे बचावले

जयंत पाटील पुढे म्हणाले की, राज्यात आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुका लढवणार आहोत. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या वतीने देखील पक्षांतर्गत लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील मतदार संघ आढावा घेण्यात आलेला आहे. दसऱ्यानंतर महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे

माजी आमदार तथा कोषाध्यक्ष हेमंत टकले, पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस नसीम सिद्दीकी, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply