Sharad Pawar : पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त त्याचा गाजावाजा करत नाही

Sharad Pawar  : 'माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो. मात्र सर्वधर्म समभावाचा विचार देणारा वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करत नाहीं," अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. 'वारकरी संप्रदायात धर्माध लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीतर्फे आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष व 'संत तुकाराम महाराज संस्थान, देहू'चे माजी अध्यक्ष बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे तसेच भारत महाराज जाधव, राजेंद्र येप्रे महाराज, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख विठ्ठल (आबा) महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष मुबारक महाराज शेख, श्यामसुंदर महाराज सोन्नर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते.

Pune Rain Update : पुरंदरमधील पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा संजय जगताप यांचे आदेश


पवार म्हणाले, "वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडीच्या नावाने काम करणारे अनेक लोक ठराविक भूमिकेतून विचार मांडण्यावर भर देत आहेत. त्यातून जातीधर्मात तेढ निर्माण होत आहे. चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांना संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. समाजातील कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक व वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांना सक्रिय व्हावे लागेल."

आबा महाराज मोरे म्हणाले, "एक हिंदू गांधीना मानणारा, तर दुसरा हिंदू गांधींना मारणारा आहे. आपल्याला गांधींना मानणाऱ्याऱ्यांची बाजू घ्यायला हवी. सनातन हिंदू धर्म समजून घ्यायला हवा." या एक दिवसीय संमेलनाचे उ‌द्घाटन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्या हस्ते झाले. सोन्नर महाराज यांनी सूत्रसंचालन केले. मुबारक महाराज शेख यांनी आभार मानले.
'वारकऱ्यांसोबत ताकदीने उभे राहणार'

शरद पवार म्हणाले, "वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येणार म्हणल्यावर काही लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मला पोलिसांचा फोन आला. परंतु वारकरी संप्रदायाचा विधायक विचार जतन करावा आणि नवीन पिढीत तो रुजावा, यासाठी वारकऱ्यांसोबत ताकदीने उभा राहणार असल्याचे त्यांना कळवले."

सुरक्षिततेबाबत सरकार अपयशी: जयंत पाटील

"वानवडीत पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक आहे. असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. राज्य सरकार महिला आणि मुलींसह आता पोलिसाचेही संरक्षण करू शकत नाही. सरकार राज्यातील जनतेची सुरक्षितता सांभाळण्यात अपयशी ठरले आहे." अशी टीका जयत पाटील यानी रविवारी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply