Sharad Pawar : पंतप्रधानांनी विधानसभेसाठी अजून सभा घ्याव्यात... शरद पवारांनी का मानले मोदींचे आभार ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज महाविकास आघाडीची (MVA) पहिली बैठक पार पडली. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी-एससीपी आणि शिवसेना (यूबीटी) चे प्रमुख नेते सहभागी झाले होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणो, "या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या तिथ आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर त्या आमच्या फायद्याच्या ठरतील."
पुढे बोलताना पवार म्हणाले, "देशाचे पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा आणि एक रोड शो घेतला त्या सर्व ठिकाणी आमच्या उमेदवारला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल."

Nagpur Accident : नागपुरात पुन्हा हीट अँड रन प्रकरण; भरधाव कार थेट दुकानात घुसली, अनेक जण जखमी, वाहनांचेही नुकसान

आज महाविकास आघाडीच्या बैठकीत एकत्र विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर बैठकी भाजला रोखण्यासाठी विविध सामाजिक संघटना, सोशल मीडिया आणि युट्यूबवर अनेकांनी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप आघाडीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील या यशामुळे महाविकास आघाडीला प्रोत्साहन मिळाले असून, या आघाडीने पुन्हा एकदा एकत्र विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. सध्या राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची विधानसभा निवडणुकीतही एमव्हीएला पुनरावृत्ती करायची आहे. त्यामुळे आज त्यांनी बैठक आयोजीत केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply