Sharad Pawar : 'निकालानंतर नेत्यांशी चर्चा, उद्या दिल्लीत बैठक', शरद पवारांनी सांगितली पुढची रणनिती!

 

Sharad Pawar : राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. राज्यात तब्बल ३० जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. राज्यातील उमेदवारांची विजयी घौडदौड सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मतदारांचे आभार मानत शरद पवार यांनी महाराष्ट्र परिवर्तनाच्या दिशेने असल्याचे सूचक व्यक्त केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्रातील जनतेचे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आभार. देशातील चित्र आशादायक आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, आम्ही १० पैकी ७ जागांवर पुढे आहेत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Kalyan Lok Sabha : विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तीन लाख लाडूंची ऑर्डर

"आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी आम्ही जाऊ, मी चंद्राबाबूंशी बोललो त्यात तथ्य नाही. मी केवळ काँग्रेस नेत्यांशी बोललो, असे म्हणत शरद पवार यांनी इंडिया आघाडीची पुढील रणनिती स्पष्ट केली.

 

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *